अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी कांद्याची आवक कमी असूनदेखील कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली पहायला मिळाली.
मागील तिन महिन्यांपूर्वी ४० रूपये प्रतिकिलो या दराने विकाला जाणारा कांदा आता तब्बल १९रूपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून उंच भरारी घेतलेला कांदा अत्यंत वेगाने कोसळत आहे.
मात्र हा कोसळणारा दर शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी करत असून आता पुढे काय करायचे? असा मोठ प्रश्न या शेतकऱ्यांपुढे उभा राहत आहे.
मागील एक महिन्यापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची कमी अधिक स्वरूपात आवक असल्याने कांद्याच्या दरात किरकोळ चढ-उतार सुरू होता व दर ३० ते ४० रुपयांपर्यंत स्थिरावलेले असायचे.
मात्र गुरूवारी आवक कमी असूनही कांद्याच्या दराने उचल खाल्लीच नाही. महाराष्ट्रातील कांदा गुजरात,तामिळनाडू,कर्नाटक,राजस्थान आदी राज्यात निर्यात केला जातो.
मात्र सध्या या भागातील स्थानिक कांदा बाजारपेठेत आल्याने आपल्या कांद्याला उठाव कमी झाला आहे.परिणामी महाराष्ट्रीयन कांद्याला मागणी कमी झाल्याने व्यापारी वर्ग कांदा खरेदी करत नाहीत.
त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली मात्र उठावच नसल्याने कांद्याचे दर कोसळले आहेत. गुरूवारी झालेल्या लिलावात एक नंबरचा कांदा १९ ते २४ रूपये,
दोन नंबरचा कांदा १४ ते १९ रूपये, तिन नंबरचा कांदा ७०० ते १४०० रूपये, तर चिंगळी कांदा ३००ते ७००रूपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
मागील काही दिवसांपासून कांद्याला मिळत असलेले उच्चांकी दर पाहता पुढे हे दर असेच टिकुन राहतील अशी शक्यता वर्तवली जात होती.
मात्र आजच्या लिलावात कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने आता चांगले दर मिळण्याच्या आशेवर मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केलेल्या अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|