अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.
यामुळे नागरिकांसह प्रशासनामध्ये देखील धाकधूक वाढली आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात शनिवारी कोरोनाच्या ८० बाधित रुग्णाची भर पडली आहे.
त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असून बाधित रुग्णाची संख्या ५०३ इतकी झाली आहे.
शनिवारी रॅपिड अँटीजेन किट तपासणीत ३६, खासगी लॅब अहवालात २८ तर नगर येथील अहवालात १६ असे एकूण तब्बल ८० रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे.
त्यामुळे तालुक्यातील बाधित रुग्णांचा आकडा ५०३ वर गेला आहे. ७२ व्यक्तींच्या घशातील स्राव नगर येथे तपासणीसाठी पाठविले आहे. तर ४२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.
तालुक्यात आतापर्यंत ५१ व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|