भरदिवसा घर फोडून सव्वा लाखांचा माल चोरटयांनी लंपास केला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. कायद्याचा धाकच उरलेला नसल्याने चोरटे खुलेआम शस्त्रे घेऊन नागरिकांना लुटत आहे.

नुकतेच जामखेड तालुक्यातील नान्नज येथील शंकर कल्याण गाडेकर यांच्या राहत्या घराचे दिवसा अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 6 तोळ्याचे दागिने व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण 1 लाख 24 हजारांचा ऐवज लंपास केला.

याप्रकरणी हनुमंत गाडेकर यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गाडेकर यांचे कुटुंब ज्वारी काढण्यासाठी शेतात गेले होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान शेतातून परत घरी आले असताना हा प्रकार उघडकीस आला.

घडलेल्या घटनेबाबत कल्याण गाडेकर यांचा मुलगा हनुमंत गाडेकर याने जामखेड पोलिसांत फिर्याद दाखल केली. दरम्यान दिवसा घरफोडी होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नान्नज पोलीस दूरक्षेत्रच्या पोलीस कर्मचार्‍यांनी गस्त करून नान्नज पोलीस दूरक्षेत्र येथेच कायमस्वरूपी थांबावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe