अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात सध्या अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातच अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे देखील वाहनधारक त्रासले आहे.
यातच आता राष्ट्रीय महामार्ग नगर-मनमाड रस्त्यावर धुळीचा धुरळा उडत असल्याने वाहनधारकांमध्ये संतापाची भावना उमटत आहे. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नगर-मनमाड रस्त्याची दुरवस्था झाली होती.
त्यानंतर सरकारने डागडुजी करून नगर-मनमाड रस्त्याची दुरुस्ती केली होती. यावर्षी रस्ता खराब होणार नाही, असे सर्वांना वाटत होते. या वर्षी सरासरीच्या प्रमाणात कमी पाऊस होऊनदेखील पुन्हा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे.
यावर्षी पुन्हा रस्ता खराब झाल्याने त्यावरील खड्डे बुजविण्याकरिता काही ठिकाणी मुरुम टाकला आहे. यामुळे वाहनाच्या रहदारीमुळे धुळीचा धुरळा उडताना दिसत आहे. नगर-मनमाड महामार्गावरून प्रवास करताना धूळ डोळ्यांत जात आहे.
राहाता शहराबाहेरून जाणारा शिर्डी बायपास रस्ता खराब असल्याने अवजड वाहनाची रहदारी राहाता शहरातून सर्रासपणे सुरू आहे.
महामार्गावरील धुळीचा धुरळा, रस्त्याची चाळण व अवजड वाहनांच्या रहदारीमुळे राहाता शहरात वाहतुकीची सतत कोंडी होत असून, प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम