पोलीस निरिक्षकांच्या वाळू तस्करी बाबत प्रसारित ऑडियो क्लिप प्रकरणाची चौकशी डिवायएसपी संदीप मिटके करणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-मागील आठवड्यात नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची ऑडिओ क्लिप विविध समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

त्यानंतर त्यांची तात्काळ बदली नियंत्रण कक्ष अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील यांनी केली होती या ऑडिओ क्लिप ची चौकशी करण्याची मागणी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने पुढील चौकशी श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आली आहे.

पोलिस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून घेता येईल तेवढे घेऊन जा.मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद अशा आशयाची एका पोलीस अधिकारी व एक इसम यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप गुरुवारी नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती त्या क्लिप मध्ये पोलीस निरीक्षक करे समोरच्या व्यक्तीला ‘

तुम्ही पिंपळगाव मध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करा मी पोलीस स्टेशन मधून पिंपळगाव येथे येण्यास निघालो आहे मी तिथे येण्याआधी जेवढे वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढे काढून घ्या नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढे जप्त करण्यात येतील.

येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील’ अशा आशयाची ऑडिओ क्लिप फेसबुक , व्हाट्सऍप आणि विविध समाज माध्यामा द्वारे व्हायरल होत आहे ही क्लिप कोणी व्हायरल केली?समोरील बोलणारा व्यक्ती कोण? या प्रकरणात अजून कोणा कोणाचा समावेश आहे?याची सविस्तर चौकशी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडून केली जाणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe