अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- केंद्र सरकारकडून पुरेसा लसीकरण पुरवठा होत नाही मागणी जास्त अन् पुरवठा कमी असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन नियोजन कोलमडल्याच्या घटना आहेत.त्यामुळे आता प्रत्येक गावोगावी लसीकरण सुरू केले आहे.
आणि त्यात देखील सुसूत्रता यावी याकरिता अधिका-यांसमावेत बैठक घेऊन योग्य त्या सुचना देण्यात आले असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले आहे. राहुरी पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ही आढावा बैठक संपन्न झाली आहे.
४५ वयोगटाच्या पुढील तसेच दुसरा ढोस असणाऱ्यांना प्राधान्य देणार असुन त्यासाठी ७० टक्के लसी राखीव ठेवल्या जाणार आहेत.
४५ वर्षाच्या पुढील व्यक्तीच्या लसीकरणासाठी गावातील समित्या त्यांना टोकण देऊन लसीकरण करण्यासाठी बोलवतील त्यामुळे इतरांनी तेथे गर्दी करू नये आणि या सर्व प्रकियेला नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील तनपुरे यांनी दिली.
सदर बैठकीस प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार फसियोद्दीन शेख,गट विकास अधिकारी गोविंद खामकर ,आरोगय अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड ,मुख्याधिकारी श्रीनिवास कुऱ्हे,नगराध्यक्ष अनिल कासार,रविंद्र आढाव आदीसह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|