अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पाथर्डी शहरात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय असल्याने तालुक्यासह परिसरातील लगतच्या तालुक्यातील देखील रुग्ण उपचारासाठी पाथर्डी येथे नियमित येत असतात.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना देखील ॲम्बुलन्सची गरज लक्षात घेऊन सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त, अशी अत्याधुनिक उपकरणे असलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण केला. याचा लाभ रुग्णांना होणार आहे.
आ गामी काळात देखील अधिकच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले.
रुग्णालयाला अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणाऱ्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा,तसेच युवान फाउंडेशनच्या वतीने सुमारे सात लाख रुपये किमतीचे वेंटिलेटर मशीन व इतर साहित्य भेट देण्यात आले.
याप्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या. यावेळी जेष्ठ नेते अशोक चोरमले, युवानचे संदीप कुसळकर, उत्तम गर्जे,उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक कराळे,डॉ.मनिषा खेडकर,डॉ.विनोद गर्जे,पं. स. उपसभापती रविंद्र वायकर,
पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर,गटनेते सुनिल ओव्हळ,नगरसेवक मंगल कोकाटे,बजरंग घोडके,नामदेव लबडे,डॉ.रमेश हंडाळ,अनिल बोरुडे,बबन बुचकुल,माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, अॅड .प्रतिक खेडकर, ज्योती मंत्री,
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, भगवान साठे, राजू गुगळे, सोनू सारूक, जमीर आतार,नवनाथ नरोटे,सचिन पालवे, आदिनाथ धायतडक आदी यावेळी उपस्थित होते.
शहरात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय असल्याने तालुक्यासह परिसरातील लगतच्या तालुक्यातील देखील रुग्ण उपचारासाठी पाथर्डी येथे नियमित येत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना देखील ॲम्बुलन्सची गरज लक्षात घेऊन सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त,
अशी अत्याधुनिक उपकरणे असलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण केला. याचा लाभ रुग्णांना होणार आहे.आ गामी काळात देखील अधिकच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आमदार मोनिका राजळे यांनी दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम