अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून शहरात सुरु असलेल्या घर घर लंगर सेवेच्या वतीने या वर्षीही रमजान ईद निमित्त गरजूंना फुड पॅकेटसह शेवई पाठवून वंचितांची ईद गोड केली. तर सकाळी अक्षय तृतीयनिमित्त आमरसचे वाटप करण्यात आले.
रमजान ईद व अक्षय तृतीयानिमित्त शहराचे विभागीय पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झेंडीगेट येथील हॉटेल अशोका मध्ये फुड पॅकेटचे पॅकिंग करण्यात आले.
यावेळी माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मन्सूर शेख, उबेद शेख, डॉ.रिजवान अहेमद, नगरसेवक आसिफ सुलतान, समीर खान, अर्शद शेख, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, मनोज मदान, राजा नारंग, सतीश गंभीर, राहुल बजाज, मन्नू कुकरेजा, सिमर वधवा, अर्जुन मदान, राहुल शर्मा, करण धुप्पड, सुनिल थोरात,
नारायण अरोरा, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, किशोर मुनोत, राजबीरसिंग संधू, राजवंश धुप्पड, गोविंद खुराणा, सनी वधवा, संदेश रपारीया, बलजित बिलरा आदी उपस्थित होते. सामाजिक जाणीव ठेऊन सुरु करण्यात आलेल्या लंगरसेवेने माणुसकीचे दर्शन घडत आहे.
कोरोनाच्या संकटकाळात कोरोना रुग्णांसह त्यांचे नातेवाईक व गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविण्याचे कार्य सुरु असून, ही लंगरसेवा सर्वसामान्यांसाठी मोठी आधार बनली आहे. तर सण, उत्सवात सर्वांना आनंद देण्याचे सेवादारांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना पोलीस उपाधिक्षक विशाल ढुमे यांनी व्यक्त केली.
हरजितसिंह वधवा यांनी या संकटकाळात हॉस्पिटलमध्ये असलेल्या सर्वसामान्यांसह गरजूंना ईद व अक्षयतृतीयाचा आनंद देखील घेता यावा यासाठी शेवई वाटपचा उपक्रम घेतल्याचे स्पष्ट केले.
उबेद शेख यांनी घर घर लंगर सेवेचे सुरु असलेल्या कार्य शब्दात सांगता येणारे नसून, त्यांच्या कार्याला सर्व समाजाचा सलाम असल्याचे सांगितले. लंगर सेवेच्या सामाजिक योगदानाबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने मन्सूर शेख यांनी लंगर सेवेच्या सेवादारांचा सत्कार केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम