अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- नेवासा तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवीचे देवस्थान असलेल्या वरखेड गावात आजपासून आठ दिवस जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेले दोन ते अडिच हजार भाविकांना पोलिसांनी व ग्रामस्थांनी केलेल्या नाकाबंदीमुळे दर्शनाविना माघारी परतावे लागले .
करोनाची तिसरी लाट येण्याची सर्वत्र भीती असतानाही वरखेड सारख्या ग्रामीण भागातील यात्रेस 20 हजार भाविक उपस्थित होते. तसेच या ठिकाणी देवीला नैवेद्य म्हणून सातशे ते आठशे बोकडबळी दिले गेले. या दोन्ही घटनांमुळे जिल्हा प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे.
वरखडे येथे यात्रेला झालेल्या गर्दीला जबाबदार धरून सरपंच, पोलीस पटलांसह देवस्थान विश्वस्त अशा 24 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. त्याधर्तीवर ग्रामपंचायत पदाधिकारी व विश्वस्त मंडळाने निर्णय घेत आठ दिवस अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण वरखेड गाव बंद ठेवले आहे.
तर आज पुन्हा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी वरखेड गावाला भेट देऊन मंदिर परिसरातील काही दुकानांचे शेड उचकटून टाकले. दरम्यान कोरोनाचा एवढा मोठा नाजूक काळ सुरु असताना स्थानिक मंदिर विश्वस्त व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांनी याबाबत हलगर्जीपणा दाखवलेला आहे. यामुळे यात्रा भरवण्यात आली होती.
यामुळे कोरोनाला निमंत्रण मिळतु शकते. यामुळे संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांनी स्वतः वरखेड येथे जाऊन सदरचे भाविकांना व दुकानांना हटवले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम