अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अद्यापही कायम आहे. यामुळे ज्या भागामध्ये तसेच तालुक्यामध्ये तथा गावामध्ये याचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
ते संबंधित ठिकाणी जनता कर्फ्यू अथवा कठोर निर्बंध लागू करण्यात आले. यातच नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे आठ दिवसांचा ‘जनता कर्फ्यु’ लावण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत उद्या शनिवार दि. 22 मे पासून 30 मे 2021 पर्यंत या आठ दिवसांचा कडक जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्यात येणार आल्याची माहिती निर्मलग्राम भेंडा बुद्रुकच्या सरपंच वैशाली शिवाजीराव शिंदे यांनी दिली.
काय सुरु काय बंद? :- जाणून घ्या या जनता कर्फ्यु दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दवाखाने व औषध दुकाने वगळता गावातील इतर सर्व दुकाने 100 टक्के बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विषयक साहित्य,खते, बियाणे इ. साहित्य दोन दिवसांच्या आत घेऊन जावे लागणार आहे.
दुध संकलन सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी 6 ते 9 कालावधीतच चालू राहील. मासे, अंडी, मटण विक्रेत्यांनी मोबाईल, हॉटस्अपवर ऑर्डर घेऊन घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर पिठाची गिरणी नियमानुसार चालू राहील.
नियम मोडला तर दंडात्मक कारवाई :- सदर कालावधीत कोणीही नियमांचा भंग केला तर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा नियम मोडला तर दुसऱ्यांदा हाच दंड 5 हजार रुपये आकारण्यात येणार आहे.
सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, शक्यतो या आठ दिवस घराबाहेर पडून नये असे आवाहन भेंडा बुद्रुक ग्रामपंचायती कडुन करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम