अठरा वर्षाच्या तरुणीची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- बारावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरात घडली आहे. कल्याणी संतोष नाईक (वय 18) असे मयत तरुणीचे नाव आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर शहरात गजानन वसाहत कॉलनी भागात राहणार्‍या कल्याणी संतोष नाईक (वय 18) या विद्यार्थिनी अभ्यास करत असलेल्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलिसांत खबर दिल्यावरून आकस्मात मृत्यू नोंदविण्यात आला आहे.

कल्याणी या विद्यार्थिनीने नेमकी कोणत्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केली याचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास हे.कॉ. काळे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News