अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- एका विवाहितेने आपल्या माहेरच्या लोकांना बोलवून आपला नवरा , दीर यांच्यासह आपल्या वयोवृद्ध सासूला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली.
याप्रकरणी निलेश अनिल लांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील सहाजणांवर मारहाण व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी येथे राहणारे निलेश लांडगे यांची पत्नी ही वयोवृद्ध सासूला संभाळायचे नाही. नवरा सर्व काही सासूचे ऐकतो.
या कारणावरून काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी येथे सासरी नांदत नव्हती. एके दिवशी निलेश लांडगे यांच्या घरी बायकोच्या घरचे मंडळी आले.
त्यांनी निलेश लांडगे यांची आई व भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वयोवृद्ध आईला काठीने मारहाण करून तिचे गळ्यातील पोत बळजबरीने तोडून घेतली.
त्यांनी निलेश लांडगे याला गजाने मारहाण केली. तसेच घरातील सामानाची नासधूस केली. याप्रकरणी निलेश लांडगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र नारायण भुजंगे, रवींद्र नारायण भुजंगे,
नारायण बापूराव भुजंगे, वच्छलाबाई नारायण भुजंगे, सिमा निलेश लांडगे तसेच एक अनोळखी महिला (सर्व राहणार नेकनूर जि. बीड) या सहा जणांवर मारहाण व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम