Election Result 2022 : “कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, पुन्हा लढू”; निवडणूक निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Published on -

मुंबई : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. मात्र शिवसेनेला (Shivsena) कुठेही यश आल्याचे चित्र दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना कुठेही यश आल्याचे दिसत नाही. यानानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर महाराष्ट्रातील भाजप नेते निशाणा साधत आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेश (uttar pradesh) आणि गोव्यात आम्हाला यश आलं नाही. पण ही तर सुरुवात आहे.

सुरुवात करणं गरजेचं असतं. सर्वच पक्षाने कधी ना कधी सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही लढत राहू. इतर सर्व राज्यातील निवडणुका आण्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत. कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, लोकांना विश्वास बसणं गरजेचं होतं. शिवसेना ठामपणे उभी राहील. आता प्रत्येक निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे लोकांसमोर सीरियसनेस वाढेल.

पुढच्या काही निवडणुकात मतांच्या मार्फत दाखवलेला विश्वास वाढेल. ही सुरुवात होती. आधी तीन जागा लढवल्या. आता 11 लढवल्या. अजून लढवू. कधी ना कधी तरी यश येईल.

अनेक पक्षांची अशीच सुरुवात झाली. सुरुवातीला लढताना त्यांचं अस्तित्व नगण्य होतं. आज ते देशात पसरले आहेत. सुरुवात कुठून तरी करावी लागते ती आम्ही केली आहे असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe