निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा राजकारणाला रामराम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयामध्ये ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार असलेले प्रशांत किशोर यांनी नुकतीच मोठी घोषणा केली.

प्रशांत यांनी राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत राजकारणाला रामराम ठोकला आहे. बंगालमध्ये भाजप दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी केले होते.

जर दोन अंकी आकडा भाजपने ओलांडला तर आपण संन्यास घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. पण भाकीत खरे ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाल्याचे ते म्हणाले.

इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून (I-PAC) आपण बाहेर पडत असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. याची सुरुवात प्रशांत किशोर यांनीच केली होती.

“भाजपा १०० जागा जिंकेल सांगत संन्यास घेण्याची मागणी करुन ट्रोल करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की,

आमचा विजय होत असतानाही आणि भाजपा १०० च्या पुढे जाऊ शकलेली नसतानाही मी बाहेर पडत आहे,” असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe