अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरातील पिंजार गल्ली येथील रिठा मज्जीद येथे भाडेकरी इमरान सादिक पटवा व त्यांचे भाऊबंद व मित्रमंडळी या भागात येऊन मशिदीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून दादागिरी करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले यावेळी मशिदीचे ट्रस्टी शेख गफूर मंसूरी, फय्याज शेख, जाफर शेख, जब्बार शेख, फिरोज शेख, बिलाल शेख, मोहसिन बागवान, फरहान खान, इलियास मंसूरी, आवेज जहागीरदार, रहीम पैलवान आदी उपस्थित होते.
निवेदनामध्ये मशिदीचे ट्रस्टी म्हणाले की रिटा मस्जिद येथे भाडेकरी इमरान सादिक पटवा व त्यांचे भाऊबंद मस्जिदच्या जागेवर त्यांनी भाडेतत्त्वावर दुकान घेतलेली आहे या दुकान समोर अतिक्रमण करून ड्रेनेज लाईन पूर्णपणे बंद केलेली आहे व अतिक्रमण करत आहे
28 एप्रिल रोजी मशिदीचे ड्रेनेज लाईन चोक अप झाल्यामुळे गटारीचे पाणी मस्जिद मध्ये शिरत होते त्यामुळे तेथील अतिक्रमण काढण्याची विनंती भाडेकरूंना केली परंतु त्यांनी दादागिरी करत दमदाटी करून मस्जिदच्या ट्रस्टी च्या नावाने कोतवाली पोलिसात खोटी तक्रार दाखल केली सदर भाडेकरूवर 13 वर्षापासून भाडे थकीत असून
9 लाख 50 हजार रुपये कोर्टाने ठरवल्याप्रमाणे येणे बाकी आहे त्यांना भाडे मागितले तर त्याचा राग मनात धरून दादागिरी करतात व मशिदीच्या दरवाज्याच्या समोर गाड्या लावून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करतात व काही बोलल्यावर अरेरावीची भाषा करतात तरी या भागात सर्व राहणारे रहिवासी हे हातावर व कष्ट करणारे व येथील
गरीब वस्ती असल्याने हे इसम मोठे धनादेश असल्याने सतत दादागिरी करतात या भागात त्यांची 10 दुकाने आहे व तो मोठा व्यापारी आहे तरी त्यांना बोलावून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व सदर मशिदीच्या जागेवर भाडेकरूंचे जागा खाली करण्यासाठी कोर्टात प्रकरण चालू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|