अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- कोरोनाकाळात जिल्ह्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यातच घरफोडी, रस्तालूट, दरोडे, मारहाण आदी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडू लागल्या आहेत.
जिल्ह्याबरोबच आता शहर परिसरात देखील या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बंद असलेल्या बंगल्यात चोरट्यांनी हात साफ केला.
20 हजार 500 रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले. भिंगारच्या गोविंदपूरा परिसरातील हसन हासिफ शेख यांच्या घरी ही चोरी झाली.
या प्रकरणी अल्फीशर खलील शेख यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान 21 मे पासून हसन शेख यांचा बंगला बंद होता.
बंद असलेल्या बंगल्याच्या खिडकीची काच व ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक खेडकर करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम