महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात वाळुतस्करांविरुद्ध पर्यावरणप्रेमींचे नदीपात्रात झोपून आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- संगमनेर शहराजवळील खांडगावमध्ये प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नाही.

त्यामुळे रास्तारोकोनंतर ग्रामस्थांनी आता थेट नदीपात्रात उतरून आंदोलन केले.निसर्गप्रेमीही या आंदोलनात सहभागी झाले होते.

कसारा दुमाला ते संगमनेर खुर्द येथील परिसरात रात्र आणि दिवस मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीपरिसर मंदिरांना धोका निर्माण झाले. मोठमोठे खड्डे पडले आहे. येथे वाळू उपसा बंद व्हावा अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे.

मात्र याकडे कोणी लक्ष देत नाही. वाळू उपसा न थांबविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. महसूलमंत्र्यांच्या मतदार संघात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाळू तस्करांवर प्रशासन कारवाई करील.

अशा अपेक्षेत आजवर वाट पाहणाऱ्या संगमनेरातील पर्यावरणप्रेमींची सातत्याने निराशाच होत असल्याने, वाळूतस्करांना प्रशासन व राज्यकर्त्यांचीही भीती नसल्याने ते उद्दाम झाले आहेत.

त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून जुनाट रिक्षांसह ट्रॅक्टर तसेच विविध वाहनांतून रात्रंदिवस वाळू उपसा सुरु असतो. दरम्यान याबाबत संगमनेरातील वृक्ष परीवाराच्यावतीने दिलेले निवेदन तलाठी पोमल तोरणे यांनी स्वीकारले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News