EPF Tips : सध्या अनेकजण नोकरी करत आहेत. काहींना जास्त पगार असतो तर काहींना कमी पगारात नोकरी करावी लागते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नोकरी करताना काही चुका टाळणे गरजेचे आहे.
जर तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढले तर तुम्हाला करोडो रुपयांचे नुकसान होईल. त्यामुळे तुमच्या पीएफ खात्यात पैसे ठेवा. जाणून घेऊया फायदे.नोकरदार लोकांसाठी पीएफ बचत करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे.

तुम्हाला तुमच्या पगारातून १२ टक्के रक्कम कापून पीएफ खात्यात जमा करतात. असे गृहीत धरा की तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून काम करत असल्यास तुमचा पगार 15000 रुपये असेल, तर तुमच्या सेवानिवृत्तीच्या 58 वर्षांतील एकूण सेवा कालावधी 38 वर्षे असू शकतो.
समजा तुमचा मूळ पगार 15000 रुपये असल्यास तर 12% मासिक दराने तुमच्या पीएफ खात्यात 1800 रुपये जमा होतात. तसेच 12 टक्के योगदानही नियोक्त्याकडून मिळते. यातील 3.67 टक्के रक्कम पीएफमध्ये आणि उरलेली 8.33 टक्के रक्कम ईपीएसमध्ये जमा करतात. एकंदरीतच पीएफ खात्यात 2350 रुपये जमा होतील.
सध्या पीएफ खात्यावर ८.१५ टक्के व्याज मिळत असून प्रत्येक वर्षी 5 टक्के वाढीसह, ही रक्कम पहिल्या 10 वर्षांत कमी राहते. जितका जास्त काळ तुम्ही खात्यात पैसे ठेवता तितका नफा जास्त आहे.
EPFO च्या गणनेनुसार, निवृत्तीनंतर ही रक्कम 1.73 कोटी रुपये होऊन ही गणना 8.1 टक्के वार्षिक वाढीनुसार आणि दर 5 वर्षांनी केली आहे. समजा तुम्ही नोकरी बदलली तर तुम्हाला पैसे काढण्याऐवजी तुमच्या पीएफ खात्यातून पैसे ट्रान्सफर केले तर त्याचा तुम्हाला सर्वात जास्त फायदा होईल. नंतर तुम्ही हे पैसे तुमच्या UAN मध्ये विलीन करू शकता. ही प्रक्रिया खूप सोपी आहे.
समजा तुमचे पीएफ खाते 5 वर्षांपेक्षा जास्त काळ चालू केले असेल तर तुम्हाला जमा केलेल्या रकमेतून काही रक्कम काढण्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. जर तुमचे पीएफ खाते 5 वर्षांपेक्षा कमी काळ चालू केले असेल, तर तुमच्या पैसे काढण्यावर कर कापला जातो .