EPFO : जर तुम्ही EPFO ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण याच ग्राहकांना लॉटरी लागली आहे. त्यामुळे या EPFO ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. काय आहे ही खास सुविधा जाणून घ्या.
सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष भूपेंद्र यादव यांनी नुकतेच EPFO च्या 63 प्रादेशिक कार्यालयांमध्ये CranTouch चे उद्घाटन केले आहे. ज्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिक कर्मचारी आहेत, त्या ठिकाणी ही केंद्रे उघडली आहेत, तसेच त्यांनी उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटनही केले.
CBT च्या 233 व्या बैठकीत EPFO चे 2022 ते 2023 चे सुधारित बजेट तसेच 2023-24 चे बजेट देखील मंजूर केले असून बोर्डाने भौतिक पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 5 वर्षांच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
यात 2,200 कोटी रुपये खर्चून जमीन खरेदी, घरांचे बांधकाम आणि विशेष दुरुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवेदनानुसार, उच्च वेतनावरील पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याच्या दिशेने उचलत असणाऱ्या या पावलांची माहिती बोर्डाला दिली आहे.
मिळणार 8.15 टक्के व्याजदर
ईपीएफओच्या बोर्डाकडून सीबीटीच्या माध्यमातून व्याजदर 8.10 टक्क्यांवरून 8.15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. EPFO कडून या आर्थिक वर्षासाठी 8.15 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत व्याज अजूनही कमी असून ईपीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यावर 8.55 टक्के दराने व्याज मिळत होते.
इतकेच नाही तर मागील वर्षभरात 40 वर्षांतील सर्वात कमी व्याज देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. 2021-22 साठी 8.1 टक्के दराने व्याज दिले होते. त्यापूर्वी तो ८.५ टक्के दराने उपलब्ध होता. 1977-78 मध्ये 8 टक्के दराने व्याज मिळाले असून या नंतर व्याज नेहमी 8.25 टक्क्यांच्या वर होते. तसेच हे लक्षात घ्या की आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.5 टक्के, 2016-17 मध्ये 8.65 टक्के, 2015-16 मध्ये 8.8 टक्के दराने व्याज मिळत होते.