ठरवून दिलेल्या वेळेनंतर आस्थापना सुरू, पोलीस निरीक्षक रस्त्यावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता.बाजारपेठेतील गर्दी, शासनाने दिलेल्या निर्धारीत वेळे नंतर दुकाने बंद केली जात नसल्याने राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ रस्त्यावर उतरले आहेत.

पोलीस जाणून बुजुन कोणावरही कारवाई करत नाही. जे व्यापारी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल त्यासाठी व्यापाऱ्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आसल्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी सांगितले.

राहुरी तालुक्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दुपारी चार नंतर संचारबंदी लागू असल्याने नागरिकांनी रस्त्यावर येवू नये.व्यापाऱ्यांनी हि निर्धारीत वेळेत दुकाने चालू ठेवावी.निर्धारीत वेळे नंतर जी अस्थापना चालू राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

कारवाई करताना पोलीस कोणताही भेदभाव करत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चार वाजता बंद करावी.पोलीस प्रशासनास कारवाई करण्यास भाग पाडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसा पुर्वी राहुरी शहरातील एका व्यापाऱ्याचे दुकान चार नंतर चालू असल्याने

व्यापाऱ्यास दुकान बंद करण्यास सांगितले होते. अन्यथा दहा हजार रुपये दंड भरण्यास तयार व्हा असे पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी सांगितले होते. परंतू व्यापारी संघटनेने पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन करुन पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी व्यापाऱ्याच्या कानशिलात लावली आहे.त्यामुळे माफी मागावी अशी मागणी लावून धरली होती.

अखेर व्यापारी आणि पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यात सकारात्मक चर्चा होवून व्यापारी आंदोलनावर पडदा टाकण्यात आला. राहुरीचे पोलीस निरीक्षक दुधाळ मंगळवारी दुपारी 4 वाजता रस्त्यावर उतरुन चार सुरु असलेल्या अस्थापनावर कारवाई करण्यात येईल. आपली दुकाने बंद करण्यात यावी संचारबंदी नियमयाचे पालन करावे.

यासाठी पोलीस निरीक्षक दुधाळ स्वतः रस्त्यावर उतरले होते. सुरु असलेल्या अस्थापनावर कारवाई करण्याचे आदेश दिले.व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. दंडात्मक व कायदेशिर कारवाई पासुन दुर राहावे संचारबंदीच्या काळात रस्त्यावर कोणी हि विनाकारण फिरकू नये असे पोलीस निरीक्षक दुधाळ यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe