लोक मेले तरी मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर.., अशी टीका भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट करत केली आहे.

मुंबईत पावसाने तांडव घातला असून शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. दरड आणि भिंत कोसळल्याने २१ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले.

दरम्यान राज्यात आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षित आपत्तींचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे आणि दरडग्रस्त भाग व मोडकळीस आलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना खबरदारी म्हणून सुरक्षितस्थळी हलवा,

असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते भातखळकर यांनी टीका केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe