तर शेतकरीसुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9  मे 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने चढउतार होत असल्याचे पाहायला मिळते आहे. यातच येत्या काही दिवसात पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे.

यामुळे बळीराजा आधीच चिंताग्रस्त झाला आहे. यातच शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक नवीन संकट येऊन उभे ठाकले आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली.

मात्र बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांची वखारीत कांदा टाकण्याची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे कांदा सडण्याचे प्रमाण जास्त असल्याने वखारीत टाकलेला कांदा जास्त काळ टिकू शकत नाही.

वातावरण सारखे ढगाळ असल्याने कांदा पीक जास्त पोषक बनले नाही. वखारीत जास्त काळ कांदा टिकू शकला नाही तर शेतकरीसुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत.

वखारी बनविण्यासाठीही मोठा आर्थिक खर्च सोसावा लागत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

सध्या एक हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना सध्या तरी तो विक्रीसाठी परवडत नाही.

त्यामुळे रुईछत्तीसी परिसरात ५०० हेक्टरवर लागवड केलेला कांदा काढून पडला आहे. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी आता साठवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळे सध्या नगर तालुक्यातील रुईछत्तीसी परिसरात वखारीत कांदा टाकण्याची लगबग सुरू आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe