हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारला वृक्षरोपण ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- वर्षभर वृक्षरोपण व संवर्धनासह विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर सर्व खर्चांना फाटा देत वृक्षरोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षरोपण अभियानाची सुरुवात सपकाळ यांच्या हस्ते रोप लाऊन करण्यात आली.

यावेळी रमेश वराडे, सुभाष गोंधळे, दिपक बडदे, अशोक लोंढे, मेजर दिलीप ठोकळ, विनोद खोत, श्रीरंग देवकुळे, रमेश कोठारी, दिलीप गुगळे, सर्वेश सपकाळ, सुधाकर चिदंबर, विकास भिंगारदिवे, मनोहर पाडळे,

भास्कर भालेराव, राजू कांबळे, अजय खंडागळे, विकास निमसे, सुर्यकांत कटोरे, अब्बास शेख, रमेश त्रिमुखे, किरण फुलारी, आसाराम बनसोडे, अविनाश जाधव, संतोष रासकर, सुधीर दहिफळे, रमेश कडूस,

नवनाथ खराडे, विलास दळवी, सुंदरराव पाटील, जालिंदर बोरुडे, सिताराम परदेशी, संजय भिंगारदिवे, अनिल जाधव, संजय बेरड, जालिंदर बेरड, हरिश साळुंके, सोहेल बिल्ला, संतोष हजारे, जालिंदर बेल्हेकर, महेश सरोदे,

दिपक बोंदर्डे, अतुल वराडे, बाळासाहेब रासकर आदी उपस्थित होते. संजय सपकाळ म्हणाले की, मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ऑक्सीजन देण्याचे मुख्य काम झाडे करीत असतात,

कोरोनाच्या संकटकाळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना लक्षात आले. झाडांकडून ऑक्सिजन मिळवण्यासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने एक झाड लावण्याचे त्यांनी सांगितले.

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविली जाते. ग्रुपच्या प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपणाने साजरा केला जातो. प्रत्येक रविवारी ग्रुपचे सदस्य लावलेल्या झाडांना जाऊन स्वत: पाणी देत असतात.

ही मोहिम वर्षभर चालू असून, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रुपच्या वतीने भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, भिंगार परिसरात लावण्यात आलेली झाडे जगविण्यात आली असल्याचे ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe