बिग ब्रेकिंग : कोर्टाबाहेर माजी सैनिकाचा गोळीबार ! नगर जिल्ह्यातील पत्नीचा मृत्यू… वाचा नेमकं काय घडलं?

Ahmednagarlive24 office
Published:

AhmednagarLive24 : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिरुर न्यायालयाच्या बाहेर आज एका व्यक्तीने दोन महिलांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

न्यायालयात घटस्फोटाची केस सुरु असताना कोर्ट परिसरात पतीने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला.

पोटगीच्या दाव्यासंदर्भात शिरूर न्यायालयात आलेल्या पत्नी आणि सासूवर पतीने पिस्तूलातून गोळीबार केला. पतीने चार गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या लागून पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू एक गोळी लागून जखमी झाली आहे.

सासूला तातडीने शिरूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराने पोलिस (आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. आपण एका लग्नाला आल्याचे त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले. या प्रकारामुळे शिरूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
सकाळी शिरुर येथे पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात दीपक पांडुरंग ढवळे (माजी सैनिक, रा. ठाणे) याने त्याच्या परवाना प्राप्त पिस्तूलमधून त्याची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे (रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) तिच्यासोबत असलेली तिची आई यांच्यावर गोळीबार केला.

तो लष्करातून निवृत्त झाला आहे. त्याने केलेल्या गोळीबारात पत्नी मंजुळा दीपक ढवळे (वय ३५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दीपक याची सासू तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५, दोघीही रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे.

संबंधित लोक हे पारनेर तालुक्यातील येथील असून त्यांनी दाखल केलेल्या पोटगीच्या दाव्याचा आज शिरूर न्यायालयात निकाल होता. त्या निकालासाठीच ढवळे आणि झांबरे कुटुंबीय शिरूरच्या न्यायालयात आले होते.

मंजुळा ढवळे हिने पतीविरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी शिरूरच्या न्यायालयामध्ये सुरू होती, त्या दाव्याचा आज निकाल होता.या निकालासाठी दीपक ढवळे आपल्या भावासह आला होता.

येताना त्याने पिस्तूल, दोन पिस्टल आणि सुरा सोबत आणला होता. मंजुळा ही आई तुळसाबाई यांच्याबरोबर न्यायालयात आली होती. न्यायालयाच्या परिसरात सुरुवातीला या तिघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर हल्लेखोर दीपक ढवळे याने कमरेचा पिस्तूल काढून फायरिंग केले.

यामध्ये पत्नी मंजुळा हिचा तीन गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला, तर सासू तुळसाबाई ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दीपक आणि मंजूळा यांच्यातील पोटगीचा दावा शिरूर न्यायालयात दाखल करण्यात आलेला होता. त्या दाव्याचा आज निकाल होता. दरम्यान, पोटगीच्या दाव्याच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आरोपीची पत्नी आणि सासू आज न्यायालयात आले होते.

न्यायालयाच्या परिसरात थांबलेले असताना दीपक ढवळे याने स्वतः जवळच्या लायसन्स पिस्तूलमधून पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आरोपीच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली आहे.

सासूवर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. त्यानंतर आरोपी दीपक ढवळे याला अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe