अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील जवळा या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात
तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेचे आराध्य दैवत छञपती संभाजी महाराज यांची तुलना ग्रामपंचायत सदस्याशी सोबत केली आहे
त्यामुळे तमाम महाराष्ट्रातील शिवप्रेमींची भावना दुखावल्या आहेत आमदार निलेश लंके यांनी पुढील दोन दिवसांत तमाम शिवप्रेमींची जाहिर माफी मागितली नाही
तर पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतीने सोमवार दिनांक २६जुलै रोजी सकाळी १० वाजता पारनेर
येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबत पारनेर पोलिस स्टेशनचे सहा.
पोलिस उपनिरिक्षक गणेश पंदरकर यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी,
वसीम राजे , सतिश म्हस्के, अविनाश पवार , मेहेद्रं गाडगे, नितीन म्हस्के, रवी रासकर , गणेश रासकर, लक्ष्मण न-हे आदि उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम