जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ पाचपुते यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ झाले उघड !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  राज्यात नावलौकिक असलेल्या काष्टी येथील सोसायटी नंबर एकचे सर्वेसर्वा भगवानराव पाचपुते यांचे भ्रष्टाचाराचे पितळ नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते व प्रा. कैलास माने यानी पत्रकार परिषदेत उघड केले.

काष्टी येथील सोसायटी नंबर एकचे सर्वेसर्वा भगवानराव पाचपुते यांच्या अधिपत्याखाली चाळीस वर्षे कार्यरत असलेल्या सहकार महर्षी काष्टी सेवा संस्थेच्या संचालक मंडळ, तसेच सचिव,

व्यवस्थापक व बॕँक अधिकाऱ्यांना कलम ८३ च्या चौकशीनंतर कलम १४६ प्रमाणे कारवाई का करू नये म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदे यांनी बजावणी केलेल्या नोटिसांमुळे श्रीगोंदे तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.p

पत्रकार परिषदेत राकेश पाचपुते व सुनील मानेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी काष्टी संस्थेच्या गैरकारभाराबद्दल एक वर्षापूर्वी सहकार खात्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सहकार मंत्र्यापर्यंत पुराव्यासह केलेल्या तक्रारीमुळे महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० चे कलम ८३ नुसार प्रमुख बारा मुद्द्यावर १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०२० या कालखंडातील कारभाराची चौकशी करण्यात आली.

चौकशी अहवालामध्ये नमूद केलेल्या निष्कर्षानुसार सर्वच मुद्द्यावर संस्था संचालक मंडळ, सचिव, व्यवस्थापक हे दोषी असल्याचे सहकार खात्याकडून सुचित करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष कैलासराव पाचपुते, अॕड. विठ्ठलराव काकडे, माजी उपसभापती वैभव पाचपुते, प्रकाश शिवराम पाचपुते, दत्तात्रय गेणबा पाचपुते,

मधूकर क्षीरसागर, आरपीआयचे बंडू जगताप, काशिनाथ काळे आदी उपस्थित होते. सहकार खात्याकडे केलेल्या तक्रारीपासून ते १४६ नोटिसा बजावण्यापर्यंत राकेश पाचपुते व सुनील माने यांनी गैरकारभाराबद्दल भांडाफोड केला होता.

१९९६ पासून २०२० पर्यंत २४ वर्षे एकाच जागेवर सचिव म्हणून काम पहाणारा एस. बी. बुलाखे यांना जिल्हा उपनिबंधक यांनी गैरकारभाराबध्दल निलंबित करून भगवानराव यांना सहकार खात्याने दणका दिला. चौकशी अधिकारी म्हणून जामखेड येथील देवीदास घोडेचोर याची नियुक्ती केली.

यामध्ये ३० मार्च २०२१ रोजी प्राधिकृत चौकशी अधिकारी याचा ७८७ पानाचा चौकशी अहवाल शासनास सादर करण्यात आला. यामध्ये पाच वर्षात कमाल मर्यादेपेक्षा जास्त कर्जवाटप करणे मध्ये संस्थेच्या १२८ सभासदांना २ कोटी २१ लाख ७८ हजार ५०० रुपये इतक्या रक्कमेचे संस्थेने नियमबाह्य कर्जवाटप केलेले चौकशीत उघड झाले.

यामध्ये संस्थेचे आजी माजी पदाधिकारी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना नियमबाह्य कर्ज वितरण झाले. अगदी दैनंदिन कामकाजावर ज्याचे बारकाईने लक्ष असते ते भगवानराव यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, पुतण्या,

भावजई यांनाही नियमबाह्य कर्ज दिल्याचे चौकशीत समोर आले. १२८ पैकी ९५ सभासदांच्या नावाने कर्जमाफीसाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले. त्यामध्ये ज्या सभासदांना नियमबाह्य कर्जे दिली. त्यांना कर्जमाफी मिळवून देत शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe