अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- संपूर्ण जगावर कोरोना संसर्गाचे संकट कायम असताना आता आणखी डोकेदुखी वाढली आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’या साथीच्या आजाराचा आढळून आला.
यामुळे नागरिकांध्मये खळबळ उडाली आहे. मंकीपॉक्स हा साथीचा आजार आहे. १९७० मध्ये पहिल्यांदा मंकीपॉक्सच आजाराचं पहिलं प्रकरण समोर आलं होतं.
जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत माहिती दिली आहे. आफ्रिकेतील ११ देशात या आजाराचे रुग्ण आढळून आले होते.
त्यानंतर २००३ साली पहिल्यांदा आफ्रिकेबाहेर अमेरिकेत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर १८ वर्षांनी मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आला आहे. २००३ साली घानावरून मागवण्यात आलेल्या पाळीव कुत्र्यामुळे अमेरिकेत संसर्ग पसरला होता.
आतापर्यंत आशिया खंडात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मंकीपॉक्स झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आल्याने संक्रमण होतं. मात्र याबाबत अजूनही वैज्ञानिकांना स्पष्ट माहिती नाही. मंकीपॉक्सची लागण ६ ते १३ दिवसात होते.
काही लोकांना ५ ते २१ दिवसातही संसर्ग होण्याची शक्यता आहे. लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये दुखापत होते. त्याचबरोबर थकवा जाणवतो. त्याचबरोबर आजारी व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात.
काही रुग्णांच्या डोळ्यावरही प्रभाव जाणवतो. मंकीपॉक्समुळे मृत्यूचं प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत असू शकतं. तर लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका आहे.
मंकीपॉक्सवर आतापर्यंत कोणतेही उपचार उपलब्ध नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.
लसीमुळे मंकीपॉक्स आटोक्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. यावर अजूनही संशोधन सुरु आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता असणं महत्त्वाचं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम