निवडणूक खर्च सादर न करणे पडले महागात ! त्या सरपंचाचे पद झाले रद्द…

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच भीमराज नामदेव चत्तर यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही,

या कारणास्तव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी भीमराज चत्तर यांचे सरपंचपद रद्द केले असून, त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.

नान्नजदुमाला येथील माजी सरपंच बाबासाहेब नबाजी कडनर यांनी जिल्हाधिकाऱ्य़ांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यात लोकनियुक्त सरपंच भीमराज नामदेव चत्तर व निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संगमनेर यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. बाबासाहेब कडनर यांचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केला.

त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (ब) मधील तरतुदीनुसार मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने

पंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरवित भीमराज चत्तर यांचे लोकनियुक्त सरपंचपद रद्द केले. त्याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe