अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोना विरुद्धच्या लढाईत लस प्रभावी ठरते आहे. मात्र देशात लसीचा तुटवडा जाणवतो आहे. देशात लस निर्माण करणाऱ्यांवर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने, आवश्यकतेनुसार लसींचा साठा मिळत नाही.
या निर्णयाचे दुष्परिणाम दिसत आहेत. देशातील सर्व राज्यांत कोविडच्या लसींचे योग्य नियोजन करण्यात केंद्राला अपयश आल्याची टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे प्रकल्पाच्या जलसेतूच्या पाहणीसाठी ते आले होते. यावेळी राज्यातील लसीकरणाच्या मुद्द्यावरून बोलताना पाटील म्हणाले,
लस देण्याचे नियोजन केंद्र सरकारच्या अखत्यारीत असून ते ढासळलेले आहे. लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांना वेळेत दुसरा डोसही मिळाला पाहिजे, याचे भान केंद्राला हवे.
दुसरी लस वेळेत मिळावी, तसेच 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी तातडीने लसीकरण सुरू करावे हा आमचा आग्रह आहे.
अन्यथा, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व जिल्हा रुग्णालये या सर्व व्यवस्थेतून महाराष्ट्र लसीकरणाचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम