अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- र्याच्या परिमंडळातून तयार झालेलं एक महाभयंकर वादळ (Storm) पृथ्वीच्या (Earth) दिशेनं झेपावत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.
या वादळाचा वेग ताशी १६०९३४४ किलोमीटर एवढा असून ते रविवारी किंवा सोमवारी पृथ्वीवर धडकेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
अर्थात पृथ्वीवर पोहोचेपर्यंत या वादळाच्या वेगात फरक पडणार असला तरी अनेक यंत्रणांवर (Systems) या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार सूर्याच्या परिमंडळातून या वादळाची निर्मिती झाली असून त्याचा परिणाम वेगवेगळ्या यंत्रणांवर होण्याची शक्यता आहे.
रेडिओचे सिग्नल, विमानाची यंत्रणा, कम्युनिकेशनची माध्यमं आणि पाऊस या घटकांवर या वादळाचा विपरित परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात,
अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. सूर्यापासून तयार झालेलं हे वादळ असल्यामुळे हे वारे अत्यंत उष्ण असतात.
त्यामुळे पृथ्वीवर जेव्हा हे उष्ण वारे आदळतील, तेव्हा पृथ्वीचं तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या उष्णतेचा विपरित परिणाम सॅलेटाईटवरही झाल्यामुळे आपल्या मोबाईल सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम