अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणमध्ये विविध घडामोडी पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांमध्ये सध्या भेटीगाठी सुरु आहे.
या भेटीगाठी वाढल्यांमुळे राज्यातील राजकारणात चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीचे सत्र सुरुच आहे.
खा. संभाजीराजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आजराज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीचे फोटो ट्विट करण्यात आले. तर बाळासाहेब थोरात यांनीही भेटीचा फोटो ट्विट करत शरद पवारांची भेट घेतल्याचे म्हटले आहे.
या भेटीत शरद पवार यांच्यासोबत महाविकास आघाडीतील महामंडळ वाटपावर चर्चा झाली. तसेच इतर अनेक राजकीय विषयांवरही चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान महसूलमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये मराठा आरक्षणाबाबतही चर्चा झाली. तसेच यावेळी बोलताना थोरात म्हणाले कि, आरक्षणाच्या विषयासंदर्भात आम्ही गंभीर आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम