फडणवीस म्हणाले कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-देशभरात मुंबई आणि महाराष्ट्राच्या कोरोना उपाय योजनांचे कौतूक होत असले तरी मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि

भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित केलेल्या नियमावलीप्रमाणे मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.

उर्वरित महाराष्ट्रात एकीकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण 0.७ टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण ३९.४ टक्के इतके आहे.

पहिल्या लाटेत सुद्धा हे प्रमाण उर्वरित महाराष्ट्रात 0.८ टक्के तर मुंबईत १२ टक्के इतके होते. मार्च २०२० ते ३० एप्रिल २०२१ या काळात मुंबईत १५९३ इतके मृत्यू हे अन्य कारणांमुळे असे नोंदले आहेत,

जे प्रमाण एकूण मृत्यूच्या १२ टक्के आहे. दुसर्‍या लाटेत तर १ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या काळात १७७३ पैकी ६८३ मृत्यू हे अन्य कारणांमुळे नोंदले आहेत. हे प्रमाण ३९.४ टक्के इतके आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News