अहमदनगर Live24 टीम, 14 जुलै 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे एका घराचे काम सुरू असताना खोदकामात मजुरांना सोन्याचा हंडा सापडल्याची चर्चा काल दिवसभर सुरू होती.
बेलापूर गावात जुने वाडे आहेत. त्यामुळे येथे गुप्त धन असल्याची कायम चर्चा होत असते. नुकतेच गावातील अशाच एका ठिकाणी एका घराचे बांधकाम सुरू होते. यावेळी खोदकाम करणाऱ्या मजुरांना एक हंडा सापडला.
त्यात त्यात सोन्या-चांदीचे दागिने होते. हा हंडा घरमालकाने ताब्यात घेतला. या बदल्यात मजुरांना काही तरी आमिष दाखविण्यात आले; परंतु ते आश्वासन पूर्ण न झाल्याने गावात याची चर्चा झाली.
त्यामुळे संबधितांनी या ठिकाणी चांदी सापडली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. दरम्यान या हंड्यात १० किलो चांदी मिळून आली.ही घटना घडून दहा बारा दिवस झाले आहेत, आता ही घटना समोर येत आहे.
त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाल्यास बऱ्याच गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. तसेच खोदकाम करताना आढळून आलेल्या हंड्यात सापडलेल्या गुप्तधनात चांदीची ११ किलो ६ ग्रॅम वजनाची १ हजार २० नाणी सापडले आहेत.
याची किंमत सुमारे ८ लाख रुपये असून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पंचनामा करुन ते ताब्यात घेतले आहेत. बेलापूर गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम