बनावट दारू बनविणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर जिल्ह्यात पर्दाफाश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- श्रीरामपूर शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बनावट दारु बनविणाऱ्या रॕकेटचा पर्दाफाश केला असून या छाप्यात साडे ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

श्रीरामपूर येथील संजयनगर ईदगाह मैदान येथे मोठ्या प्रमाणात बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप संचालक  अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा,

विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक एस बी शेंडे, एस. एम.सराफ उपआधिक्षक अ विभाग , ऐ बी बनकर निरीक्षक ब विभाग,

एस. के. कोल्हे निरीक्षक कोपरगाव, बी बी हुलगे, निरीक्षक श्रीरामपुर,  ऐ. व्ही.पाटील निरीक्षक ,पी. व्ही अहीरराव ,एम.डी.कोडे ,व्ही.एम बारवकर,एम. एस. धोका, एस.बी. भगत येथे संजयनगर येथे छापा टाकला असता

त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले या ठिकाणी बनावट दारु तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट २०० लिटर  बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे

३०लिटर विदेशी मद्य १८०मिली क्षमतेच्या ४४० बनावट ब्रँण्डच्या बाटल्या बनावट देशी मद्याच्या १८०मिलीच्या ३८४बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा  लेबलच्या बाटल्या बनावट देशी व विदेशी दारुची बुच नामांकिता कंपनी इम्पेरियल

ब्लू व मेक्डाल न. १ विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या कृत्रीम स्वाद पदार्थ  इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम एम एच ०६ बी जी ०८५२ क्रमांकाची पिकअप वाहन असा ६ लाख एकुण पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून

मोहन यशवंत काळे( रा.दत्तनगर) राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना( रा.ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश ह मु संगमनेर), चंद्रकांत शाम पवार यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe