सोन्याच्या दरात घसरण ..जाणून घ्या नेव बाजारभाव

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-शुक्रवारी सोन्याचांदीच्या किमतीत घसरण दिसून आली आहे.

तर गुरुवारी यूएस ट्रेझरी यील्ड एक महिन्याच्या घटत्या पातळीवर आल्याने सोन्याचा दर या आठवड्यात वाढल्याचे पाहायला मिळाले होते

तर एमसीएक्सवर जून वायदानुसार सोन्याचा शुक्रवारचा दर ५५ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅमनुसार ४७,१२० रुपये इतका झाला आहे.

चांदीबद्दल बोलायचे झाले तर मे वायदानुसार चांदीची किंमत १७९ रुपयांनी स्वस्त होऊन ६८,३७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे.

सोन्याचे दर गुरुवारी वधारले होते. कोरोनाच्या महामारीत, टाळेबंदीत अर्थव्यवस्था अस्थिर झाली आहेत. म्हणून नागरिक आणखी एकदा सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीचा आधार घेत आहेत.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड्समध्ये गुंतवणूकदारांनी तब्बल ६,९०० कोटी गुंतवले होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe