अहमदनगर Live24 टीम, 16 जुलै 2021 :- जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल तर आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या किमतीत घट झालीय, तर चांदीही स्वस्त झालीय.
जागतिक बाजारात धातूंच्या किमती खाली आल्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत प्रति 10 ग्रॅम सोने 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर आले.
16 जुलै रोजी एमसीएक्सवर ऑगस्ट डिलिव्हरीसाठीचे सोने 22 रुपयांच्या घसरणीनं उघडले आणि दिवसा सोन्याचा दर जसजसा वाढत गेला, तसतसे त्याच्यात घसरण वाढली. दुपारी 3 वाजता ते 145 रुपयांच्या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम 48,255 रुपयांवर होते.
मागील चांदीची किंमत 196 रुपयांनी घसरून 68,043 रुपये प्रति किलो झाली. दरम्यान सॉवरेन गोल्ड बॉन्ड चौथी सीरिज इश्यू 12 जुलै अर्थात सोमवारपासून उघडलाय. त्यात गुंतवणूक करण्याचा आता शेवटचा दिवस आहे.
ते आज अर्थात 16 जुलै रोजी बंद होणार आहे. यामध्ये प्रति एक ग्रॅम सोन्याची किंमत 4,807 रुपये निश्चित करण्यात आलीय.
आपण ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला आणखी 50 रुपयांची सूट मिळेल. म्हणजेच, तुम्ही एक ग्रॅम सोनं 4,757 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम