सोने-चांदीचे दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया मजबूत झाल्याने सराफा बाजारामध्ये प्रति दहा ग्रॅमसाठी सोन्याची किंमत ४४० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक स्वस्त झाली असून, आज चांदीचा प्रतिकिलो दर ६३ हजार ६२८ रुपयांवर आला आहे. दरम्यान गेली काही दिवस सोने चांदीचे भाव वाढ झाल्यानंतर आता सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.

सराफा बाजारात सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. सराफा बाजारामध्ये सोन्याचे आजचे दर ४७ हजार ४४५ रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा होता.

तर तुलनेत चांदीची किंमत सुद्धा घसरली असून, औद्योगिक मागणी घटल्याने एक किलोग्रॅम चांदीचा दर ६९ हजार ३२९ रुपयांवरून घसरून ६८ हजार ६२३ रुपये एवढा झाला आहे.

मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस १७८०.८६ डॉलरवर स्थिर राहिला आहे. तर सोन्याच्या वायदे बाजारात मोठे बदल झाले असून सोने प्रति औंस १७८०.१० डॉलरवर विक्री झाले आहे.

दरम्यान, डॉलरच्या किंमती वाढल्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली. २२ कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे.

दिल्लीमध्ये ४६ हजार २४० रुपये प्रति १० ग्रॅम चेन्नईमध्ये ४४ हजार ६९० कुपये प्रति दहा ग्रॅम कोलकात्यामध्ये ४७ हजार ४३० रुपये प्रति १० ग्रॅम

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News