पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले…

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- वेधशाळेने व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजावर अनेकदा शेतकरी त्याची शेतीच्या कामाची तयारी करतो. मात्र अनेकदा वेधशाळेचे अंदाज चुकतात.

अशाच प्रकारे चुकलेल्या पावसाच्या अंदाजावर संतप्त होऊन हवामान खात्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वेधशाळा आणि कुलाबा वेधशाळेनेचे़ पावसाबद्दलचे खोटे अंदाज व्यक्त करून माझे आणि राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे.

हा फसवणुकीचा प्रकार आहे.त्यामुळे हवामान खात्याच्या विरोधात माझी फिर्याद दाखल करून घेत गुन्हा नोंदवावा, अशी विनंती करणारा तक्रार अर्ज “मी शेतकरी आत्महत्या करणार नाही” अभियानाचे अध्यक्ष माणिक कदम यांनी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केला आहे.

हवामान खात्याने एप्रिल-मे मध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करीत यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर विसंबून देशातील शेतकर्‍यांनी मोठया प्रमाणात पेरण्या केल्या होत्या.

त्यासाठी महागडे बियाणे खरेदी केले होते.प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस झालाच नाही.त्यानंतरही येत्या ४८ तासात पाऊस येणार ७२ तासात येणार असे सांगत हवामान खाते शेतकर्‍यांना फसवत राहिले,

यामागे बियाणे कंपन्या,खत आणि औषधी कंपन्यांचे आणि हवामान खात्याचे काही आर्थिक हितसंबंध असावेत अशी शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News