हमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-माझ्या कुंटुबातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. मी कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आल्याने मी माझी कोरोना तपासणी करुन घेतली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र मी होमकाँरंन्टाईन झाले आहे.
त्यामुळे पाथर्डी व शेवगाव येथे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थीतीत झालेल्या बैठकीला उपस्थीत राहता आले नाही. अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पाथर्डी व शेवगांव तालुक्यात कोविड-१९ संदर्भात आढावा बैठका झाल्या. तसेच पाथर्डी येथे मा.आ. राजीव राजळे कोविड केअर सेंटर येथे सुरु करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना मी उपस्थीत राहणार होते.
परंतू माझ्या कुटुंबातील काही व्यक्ती या कोरोना पॉझीटीव निघाल्यामुळे व मी त्यांच्या संपर्कात आले असल्याने मी उपस्थीत राहु शकले नाही.
माझीही कोरोना चाचणी केली असून, त्याचा रिर्पार्ट अद्याप आला नसल्याने आपल्यापासून इतरांना संसर्गाचा धोका होवू नये.
यामुळे मी घरीच काँरन्टाईन झालेले आहे. मतदारसंघातील सर्व नागरीकांनी कोरोना साखळी तोडण्यासाठी घरातच राहून स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच कामाव्यतिरीक्त कोणीही घराच्या बाहेर निघु नये. असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|