प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे आजारपणामुळे निधन

Published on -

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे ४२ व्य वर्षी निधन झाले. वर्षांचे होते. त्यांना किडनी विकार होता व काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना झाल्याचं निदानही झालं होतं.

त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. रविवारी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना चेंबुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काही महिन्यांपूर्वीच त्यांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. रविवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली. किडनी विकारामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती.

त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांचे निधन झाले. वाजिद खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदपैकी एक होते.

1998साली आलेल्या सलमान खान अभिनित प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाद्वारे त्यांनी संगीत दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर चोरी चोरी चुपके चुपके, हॅलो ब्रदर, मुझसे शादी करोगी, पार्टनर, दबंग (1 ते 3) अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News