अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-नापीक शेती व डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, त्यामुळे हे कर्स फेडायचे या विवंचनेत जामखेड तालुक्यातील नान्नज येथील युवक शेतकरी बाळु बाबुराव मोहळकर (वय ४७) याने आपल्या शेतातील रहात्या घरात विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
या घटनेमुळे नान्नज गावात शोककळा पसरली असून,सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वृध्द आई,पत्नी,मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत सविस्तर असे की,
मयत बाळु मोहळकर यांच्याकडे बँकेचे कर्ज होते. शेतात नापीकीने परेशान झाल्यामुळे उत्पनासाठी त्याने दुग्ध व्यवसायासाठी दोन जर्सी गायी घेतल्या होत्या.
मात्र दुर्दैवाने तापाच्या आजाराने या दोन्ही गायींचा मृत्यू झाला. त्यामुळे ते आता आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरणार या विचाराने चिंतीत असायचे.
याच वैफल्यातून त्यांनी एक मार्च रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या पांढरीचा मळा या शेतातील रहात्या घरी विषारी औषध प्राशन केले.
नंतर त्यास उलटी होऊ लागल्याने त्यांनी आपल्या घरच्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने जामखेड येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून जात असतानाच दवाखान्यात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
त्यांच्या मागे वृध्द आई, पत्नी, मुलगा, एक मुलगी असा परिवार असून, बाळु मोहळकरच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाचा आधारच हरपला आहे.
त्याच्या मृतदेहावर जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात पांढरीचा मळा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|