‘ह्या’ पिकाच्या लागवडीतून शेतकरी कमावतोय 25 लाखांचा नफा, जाणून घ्या तुम्हीही …

Ahmednagarlive24 office
Published:
strawberry farming

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- सध्या शेतकरी विविध समस्यांशी झगडत आहे. परंतु याच दरम्यान, काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतीने लोकांना हैराण केले आहे, अशीच काहीशी बातमी पुण्यातून येत आहे.

पुण्यातील मावळ गावात स्ट्रॉबेरीची लागवड सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. येथील शेतकरी स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून दरवर्षी 25 लाख रुपये कमावत आहेत.

मावळचे नशीब बदलले :- मावळमध्ये फक्त ऊस आणि धन्याचीच लागवड केली जात होती, मात्र आता स्ट्रॉबेरीही घेता येते हे या भागातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातही या स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे. महाराष्ट्रातील स्ट्रॉबेरीचे सर्वात जास्त उत्पादन महाबळेश्वर येथे होते .

हिवाळ्यात लोक महाबळेश्वरला जाऊन लाल-केशरी स्ट्रॉबेरी चाखायचे, मात्र आता मावळ मधेही ते शक्य असल्याचे मावळातील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग केले तर ते नक्कीच यशस्वी होतात. येथील शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती, ज्यातून त्याला आता 25 लाख रुपयांचा नफा मिळत आहे. योग्य नियोजन आणि मेहनत घेऊन त्यांनी या पिकाची लागवड केली.

हिवाळ्यातील स्ट्रॉबेरीची मागणी वाढली आहे :- महाबळेश्वरमध्ये वाढणारी ‘विंटर डाउन’ स्ट्रॉबेरीची जात आता मावळ मदेही दिसून येत आहे. मावळ येथील शेतकरी प्रदीप धामणकर यांनी महाबळेश्वर येथून या जातीचे बियाणे आणले होते. त्यात त्यांनी 30 गुंठे जागेत पंधरा हजार झाडे लावली होती आणि आता स्ट्रॉबेरीची काढणी सुरू आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात या स्ट्रॉबेरीची मागणी वाढत आहे.

या स्ट्रॉबेरीची आंतरराष्ट्रीय बाजारात 1000 ते 1500 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते. या ठिकाणची स्ट्रॉबेरी प्रामुख्याने दुबई, मस्कत आणि सिंगापूर येथे पाठवली जात आहे. स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी केवळ 5 लाख रुपये खर्च झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले. त्यामुळे आता स्ट्रॉबेरी तयार होऊन ती आंतरराष्ट्रीय बाजारात विकली जात असल्याने त्यांना किमान 25 लाख रुपयांचा नफा मिळत असून आणखी नफा अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांचा उत्साह कायम :- येथील शेतकऱ्याने 30 गुंठे जमिनीत गादीचे वाफे तयार करून त्यावर गोमूत्र टाकले. एका रोपात किमान एक किलो स्ट्रॉबेरी येते. आता मावळातील शेतकरी केवळ भात आणि उसावर अवलंबून न राहता विविध प्रयोगातून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असून, त्यात यशही येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe