अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- नैसर्गिक आपत्ती याची जोखीम म्हणून २०१८-१९ ला दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला.
२०२० ला मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचा खरीप व रब्बी हंगामातील पिके अतिवृष्टीमुळे वाया गेले.
तरीही शासनाने व विमा कंपन्या कडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे बळीराजा उपाशी राहिल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप व रब्बी हंगामातील सर्व पिकाची नासाडी झाली होती. यामुळे राज्य शासनाने अशा बाधित पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते.
तालुका कृषी व महसूल विभाग यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करुन अहवाल शासनास पाठवला तरीही शासनाने आजपर्यंत काहीही कार्यवाही केलेेली नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम