अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- चितळी परिसरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात मोठा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता, परंतु अद्यापही मोठा पाऊस न पडल्याने पाणीसाठाही न वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या हंगामातील पिक घेण्यास बळीराजा सज्ज झाला असून तो पावसाची प्रतिक्षा करत आहे.
कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीनुसार शेतीचे नियोजन करून आपले उत्पन्न घ्यावे लागत असल्याने शेतकरी पेरणीयोग्य पावसाची अपेक्षा करीत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तेथील बळीराजा काही अंशी सुखावला आहे तर काही भागात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.
अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. मात्र अद्याप पावसाने हजेरी न लावलेल्या भागात चांगला पाऊस झाल्यास जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांचा लाभ मिळणार असून पाणीपातळी वाढण्यात मदत होणार असल्याने शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत.
परंतु मागील अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. या परीसरातील मुख्य पिक असलेल्या ज्वारी पिकाची पेरणी न झाल्यास वर्षभराच्या सालचंदीचा प्रश्न निर्माण होतो. नदी, विहीर, तलाव, विंधन विहीरीच्या पाणीसाठ्यात वाढ न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. सध्या आकाशात काळे ढगही तयार होतात.
रिमझिम स्वरुपाचा पाउसही पडतो परंतु प्रत्यक्षात मोठा व पुरेसा पाऊस मात्र पडत नाही. जर वेळेवर चांगला पाऊस झाला नाही तर अनेक शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अल्प प्रमाणात पर्ज्यन्यवृष्टी झाल्यास जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होतो म्हणून या वर्षी चांगला पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडेल .पुढची सर्व आर्थिक गणिते चुकतील .त्यामुळेच सध्या शेतकरी वरुणराजाची मनधरणी करताना दिसत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम