PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना बसला झटका! मिळणार नाही 13वा हप्ता, यादीत तुमचेही नाव नाही ना? पहा

PM Kisan Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना चालवत असते. त्यापैकी एक म्हणजे पीएम किसान योजना होय. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर बातमी काळजीपूर्वक वाचा. कारण आता करोडो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने 13वा हप्ता मिळण्यापूर्वी अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना 13वा हप्ता मिळणार नाही. त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. अपात्र शेतकऱ्यांच्या यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

क्रमांक १

ज्यांनी अजूनही त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले नाही त्यांनी ते लवकरात लवकर करा, नाहीतर तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

क्रमांक २

जर तुम्ही आत्तापर्यंत ई-केवायसी केले नसेल, तर तुम्ही हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. नियमानुसार, हे पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ते http://pmkisan.gov.in या वेबसाइटवरून किंवा जवळच्या CSC केंद्रावरून करू शकता.

क्रमांक ३

तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन पडताळणी झाली नाही, त्यांना हप्ता मिळणार नाही. नियमांनुसार, या योजनेशी निगडित प्रत्येक लाभार्थ्याने हे करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

कधी मिळणार पैसे

आतापर्यंत 12 हप्त्यांचे पैसे शेतकर्‍यांना मिळाले असून, आता 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. रिपोर्ट्सनुसार, 13व्या हप्त्याचे पैसे फेब्रुवारी महिन्यातच जारी करण्याची शक्यता आहे. परंतु, याबाबत अधिकृत घोषणा केली नाही.