अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-महावितरणकडून राबवण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या थकबाकीत भरघोस सवलत देत थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४४ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तर नाशिक परिमंडळात ७५ कोटी १८ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
महावितरणच्या वसुली मोहिमेला काही शेतकऱ्यांनी विरोधही दर्शविला. थकीत वसुलीसाठी महावितरण सक्ती करीत असल्याचा आरोपही झाला.
या योजनेंतर्गत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांकडील सुमारे १५ हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला. ही योजना तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.
पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत, तसेच व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दोन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के, तर तीन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्ण माफ होणार आहे.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|