आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना मिळणार एकरी 8 हजार 640 रुपये; वाचा याविषयी

Ahmednagarlive24 office
Published:

Government scheme : आपला जैव विविधतेने नटलेला भारत देश शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणून संपूर्ण जगात ओळखला जातो.

देशाची अर्थव्यवस्था शेती व शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असल्याने भारताला शेतीप्रधान देशाचा किताब देऊन जणू काही गुण गौरवचं करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या शेतीप्रधान देशाचा कणा म्हणजेच आपला बळीराजा (Farmer) देशाच्या विकासात मोठे अनमोल असे योगदान देत असतो.

यामुळे मायबाप शासन (Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभे असते. एवढेच नाही तर शासन आपल्या अनेक योजनांच्या (Farmers Scheme) माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक मदत करत असते. या क्रमात मायबाप सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना खते आणि बियाणांसाठी काही पैसे पाठवत असते.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मायबाप सरकार दरवर्षी खत बियाणांसाठी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 7840 रुपये एकरी कर्ज स्वरूपात पाठवते. मात्र यावेळी वाढती महागाई पाहता सरकारने कर्जाच्या रकमेत वाढ केली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना खते आणि बियाणांसाठी एकरी 8640 रुपये मिळणार आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दरवर्षी शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून शेतीसाठी कर्ज दिले जाते. मात्र शेतकऱ्यांना हे कर्ज बँकेकडून दोन प्रकारे मिळते.

एक रोख स्वरूपात आणि दुसरी खते आणि बियाणांच्या स्वरूपात दिली जाते. पीकविक्रीच्या वेळी सोसायटय़ांमध्ये बँकेच्या कर्जाची रक्कम कापली जाते. असे केल्याने शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारे बोजा पडणार नाही.

त्यातून शेतकऱ्यांचे कर्ज फेडले जाते आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पैसेही मिळतात. सहकारी बँकांच्या अहवालानुसार, गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना 2 अब्ज रुपयांचे कर्ज देण्यात आले. यावर्षीही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज स्वरूपात अडीच अब्ज रुपयांपर्यंत वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

असे मिळणार कर्ज
सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या आहेत. यापैकी एक म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. तुम्ही शेतकरी असाल आणि शेती करण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या या योजनेद्वारे तुम्हाला शेतीसाठी सहज कर्ज मिळू शकते.

यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्हा सहकारी बँकेशी संपर्क साधावा लागेल. याशिवाय, तुम्ही KCC योजनेच्या माध्यमातून देखील कर्ज मिळवू शकता म्हणजेच इतर राष्ट्रीयकृत खाजगी बँकांद्वारे शेतीसाठी कर्ज घेऊ शकता. परंतु प्रत्येक खाजगी बँकेत कर्जाची रक्कम वेगळी असते हे लक्षात ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe