अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Farmers news, :- शेतकऱ्यांनी यावर्षी पीक पद्धतीमध्ये बदल करून रब्बी हंगामात उत्पादन वाढविण्यासाठी कडधान्य पिकावर भर दिलेला दिसत आहे.
तर त्यात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन वाढले आहे . शिवाय जमीन व पाण्याचा योग्य सदउपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनी मका पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.
असे असले तरी वाढत्या मका उत्पादन क्षेत्रावर मर रोग आणि मुळकूज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे त्याचा उत्पादनावर तर परिणाम होणारच आहे. पण त्याचा चारा पीक म्हणून उपयोग होतो. की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलत्या वातावरणामुळे व पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत असून त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झाला आहे.
रोग नियंत्रणासाठी हे उपाय करा
रोग प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रावर 5 ट्रायकोडर्मा प्रति हेक्टरी 100 किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावी लागणार आहे. मात्र याचे प्रमाण वाढली तरी कोणताही विपरीत परिणाम होतो नसून जैविक बुरशी अधिक परिणामकारक ठरते.
मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक 1 टक्का या प्रमाणात फवारावी किंवा ठिबकद्वारेही देता येणार आहे. जसे की कार्बेन्डसीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घ्यावी.