farming business ideas : या फळबागा देतील तुम्हाला लाखोंचा नफा; जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- शेतकऱ्यांना फळबाग म्हणले की खर्चिक काम वाटत असले तरी काही फळझाडे असेही असतात. की ती कमी कालावधीत उत्पादनाला येतात. आणि कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवून देतात.

अशा काही फळे झाडांबद्दल शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. तर कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे फळझाडे शेतकऱ्यांनी लागवड केली असता. त्याला कमी कालावधीत झाडांपासून अधिकचा नफा घेता येणार आहे.

कमी काळात जास्त फळ देणारी फळझाडे:

पेरू – पेरूची लागवड करण्यासाठी कलमांच्या रोपांचा वापर केल्यास 8 ते 9 महिन्यात फळे तोडायला येतात. तर हीच बीयांमधून पेरूची लागवड केल्यास वेळ जाऊन फळ येण्यास देखील उशीर होतो.

अंजीर – अंजीर फळांमध्ये लोह आणि अँटीऑक्सिडंट्सने प्रसिद्ध आहे. त्यामुळे हे फळ आरोग्य साठी चांगले असून लोहाची कमतरता,लो सुगर, रक्तदाब यावर उपयुक्त असे फळ आहे. अंजीर फळा मध्ये आत रसाळ कंद व बारीक कुरकुरीत बिया असतात. या फळझाडांची कापणी 2 ते 3 वर्षात वेळा केली जाते.

पपई – पपई साठी खर्चही खूप कमी येतो.तर पपई चे फळ झाड वेगाने वाढते. अगदी 9 ते 11 या कालावधीत कापणीला येतात. हे फळ पूर्ण पिवळे होण्याआधी तोडावे. लागवडीनंतर काही महिन्यात उत्पादनाला सुरुवात होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पपई फळ झाडांची लागवड केली जाते.

फळपीक लागवडीसाठी जमीन निवडताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी व त्या जमिनीचा पीएच 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा.

फळपिकांची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी. ज्या जमिनीची खोली 30 ते 45 सें. मी. असते, अशा जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. परंतु 7.5 सें. मी. पेक्षा कमी खोल जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत.

1.पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल – मेमध्ये फळझाडांच्या लागवड अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घेऊन हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.

2. चिकू,आंबा, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.

3. मध्यम खोल जमिनीत 45 ते 90 सें. मी. पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.

4. फळबागेसाठी जमीन शक्‍यतो सपाट असावी. जमिनीचा उतार 2 किंवा 3 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नसावा. ज्या जमिनीचा उतार 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून फळपिकांची लागवड करावी.

5. जमिनीचा उतार दक्षिण-पश्‍चिम दिशेला असल्यास फळझाडांसाठी चांगले असते. कारण अशा ठिकाणी हवा उष्ण व कोरडी राहते.

6.फळबाग लागवडीसाठी खड्डे काढण्यापूर्वी कोणत्या लागवड पद्धतीने लागवड करावयाची आहे, यानुसार खड्डे खोदून घ्यावेत. प्रत्येक पद्धतीत दोन झाडांतील अंतर आणि दोन ओळींतल्या अंतराप्रमाणे खड्डे काढावेत.

7.पूर्वमशागतीची कामे झाल्यानंतर एप्रिल – मेमध्ये फळझाडांच्या लागवड अंतराच्या शिफारशीनुसार योग्य लांबी, रुंदीचे खड्डे घेऊन हे खड्डे पोयटा माती, पालापाचोळा, शेणखत, जैविक खते, ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट, शिफारशीत कीडनाशक पावडर यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe