फास्टटॅग ! रोख स्वरूपात होत असलेली टोलवसुलीचा प्रवास कॅशलेसकडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल हा फास्टॅगद्वारे भरण्यात यावा, असं वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटलं होतं.

तसेच तोल नाक्यावरील लांबच लांब रंगांपासून वाहनधारकांची सुटका व्हावी यासाठी फास्टटॅग सुरु करण्यात आले होते. याचीच अमलबजावणी नगर जिल्ह्यात देखील झालेली पाहायला मिळाली आहे.

अहमदनगर-पुणे महामार्गावर सुपा टोल नाक्यावर गेल्या काही दिवसांपासून फास्ट टॅग वापरणारांची संख्या वाढली असून गेल्या दोन दिवसांत फास्ट टॅग वापरण्याचे प्रमाण डबल झाले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वेळोवेळी पथकर वसुलीसाठी वाहन चालकांना वाहनावर फास्ट टॅग वापरण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून ऑनलाईन व्यवहार होतील.

प्रवाशाचा वेळ वाचेल व टोलनाक्यावर रोज होणार्‍या वादावादीही टळतील. हा त्यामागचा शासनाचा उद्देश आहे. शासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी शेवटची मुदत देत सर्वच वाहन धारकाना फास्ट टॅग वापरणे सक्तीचे केल्याने पूर्वी अल्प प्रमाणात असलेले फास्ट टॅग वापराचे प्रमाण वाढून आता 65 टक्के ते 70 70 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

जानेवारी 2021 पर्यंत टोल फास्ट टॅग व रोख असे निम्मे निम्मे प्रमाण होते; परंतु 16 फेब्रुवारी 2021 पासून फास्ट टॅग वापरकर्त्याचे प्रमाण डबल झाले आहे. फास्ट टॅगमुळे वाहन चालकांचा वेळही वाचतो.

व्यवहारही कॅशलेस, सुरक्षीत व पारदर्शक होत असे टोल वसुली व्यवस्थापकाच्यावतीने सांगितले जात आहे. दरम्यान या टोलनाक्यावर पेटीएम व आयसीआयसीआय बँक या दोन संस्थांनी वाहनधारकांना फास्ट टॅग बनवून देण्यासाठी स्टॉल लावले आहेत

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News